शेतकरी कुटुंबातील मुलांची उंच भरारी!!
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील मौजे कोटी गावच्या शेतकरी कुटुंबातील दोन सख्या भावंडांची शासकीय सेवेत निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दादा महादेव डोंगरे यांची पोलीस सेवत तर व केशव महादेव डोंगरे यांची अग्निशामक दलात नुकतीच निवड झाली आहे.
शेतकरी कुटुंबातील या दोन भावंडांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मेहनतीच्या जोरावर शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकार करत वडिलांच्या कष्टाचे फळ केले.त्यांच्या या यश वडील महादेव डोंगरे,आई कावेराबाई यांचा मोठा वाटा तर मोठा भाऊ अशोक डोंगरे यांचे विशेष प्रयत्न यांच्या निवडीसाठी झालेले आहेत.
दोघांच्या या निवडीबद्दल गावकऱ्यांच्या वतीने जंगी सत्कार सत्कार करण्यात आला. एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ शासकीय सेवेत लागल्याने कोटी गावची मान उंचावली असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने सत्कार कार्यक्रमाच्या वेळी सांगण्यात आले.

