shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी महाविद्यालयात ‘इतिहास विषय-नोकरीच्या संधी’ विशेष व्याख्यान संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
बु दिनांक ०३ मे २०२३

राहुरी महाविद्यालयात ‘इतिहास विषय-नोकरीच्या संधी’ विशेष व्याख्यान संपन्न..!!
 
राहुरी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरी, जि.अहमदनगर येथील इतिहास विभागाच्या वतीने आयोजित, ‘‘इतिहास विषयातील करियरच्या विविध संधी’’ या विषयावर विशेष व्याख्यान संपन्न झाले.

 या व्याख्यानासाठी मार्गदर्शन इतिहास विभागप्रमुख डॉ.अमोल गायकवाड यांनी केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संभाजी पठारे हे होते. डॉ.गायकवाड यांनी, इतिहास विषयातून रोजगाराच्या/नोकरीच्या सरकारी, निमसरकारी, खाजगी, स्वतंत्र व्यवसाय, संशोधन क्षेत्र याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. इतिहास विषय घेऊन विद्यार्थी हे शिक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र, पुरातत्व विभाग, पर्यटन क्षेत्र, मानववंशशास्त्र, वस्तुसंग्रहालय क्षेत्र, लिपिकशास्त्र, शिलालेखशास्त्र, नानकशास्त्र, हस्ताक्षरतज्ञ, मुर्तीशास्त्र, यु.पी.एस.सी./एम.पी.एस.सी., सागरी पुरातत्व, ग्रामीण विकास क्षेत्र, देशसेवा, कायदा अशा विविध क्षेत्रामध्ये करिअर करू शकतात. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.पठारे म्हणाले, ‘‘इतिहास हा भूतकाळात घडणाऱ्या व वर्तमानात निर्माण केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक परंपराचा मौलिक ठेवा आहे.
      प्रत्येक विद्यार्थ्याने विविध गावातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक घटकांचे इतिहास लेखन करावे. समाजातील विविध समस्यांचा आढावा घेऊन त्यावर लेखन करावे. विविध गावांचे सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करावे. पुरातन मंदिरांचे इतिहास लेखन करावे.

 पुढील पिढ्यांना माहितीचा ऐवज उपलब्ध करून देणे, ही आपली जबाबदारी आहे.’’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अमोल गायकवाड यांनी केले. त्यांनी विभागामार्फत आयोजित नवनवीन उपक्रमांची (मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग, ब्राह्मी लिपी वर्ग) याची माहिती दिली. तसेच या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शुभम कोरडे याने केले. तर आभार प्रा.प्रतिक्षा देशमुख यांनी केले. यावेळी महाविद्यालाच्या उपप्राचार्या (शैक्षणिक) व हिंदी विभागप्रमुख  प्रा.डॉ.अनिता वेताळ, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.अनिरुध्द जाधव, प्रा.वैशाली डौले, प्रा.डॉ.संदीप इरोळे आणि महाविद्यालयाचे ८७ विद्यार्थी उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close