श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थी अजित पांडुरंग पवार याने पुणे येथील राजाराम भिकू पठारे स्टेडियमवर क्रांतिज्योती महिला प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय व्यावसायिक युवा कबड्डी सिरीज २०२३ स्पर्धेत अहमदनगर संघाचा संघनायक म्हणून सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आणि अहमदनगर संघास सुवर्णपदक मिळवून दिले.
अजित ने मिळविलेल्या यशाबद्दल अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, उपाध्यक्ष योगेश विटनोर,सचिव सोपानराव राऊत,सहसचिव भास्कर खंडागळे,कार्यकारी अधिकारी मंजुश्रीताई मुरकुटे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अजितचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अजित ने मिळविलेल्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सुनीता गायकवाड यांनी अजित चा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील परीक्षा अधिकारी प्रा. दिलीप खंडागळे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका शारिरीक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. विवेक साळवे कार्यालीन अधीक्षक बाबासाहेब पटारे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

