shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा'..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक ०५ मे २०२३

‘अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी व दंडाची शिक्षा'..!! 

अहमदनगर : आरोपी नामे रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख , वय - १ ९ वर्षे , रा . शेंडी ता . जि . अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अहमदनगर येथील मा . पी . आर . देशमुख साहेब , अतिरिक्त व विशेष ( पोक्सो कोर्ट ) जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी आरोपीस भा.दं.वि. कलम ३६३ नुसार दोषी धरून २ वर्षे सक्त मजुरी व रूपये ५,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद तसेच लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा २०१२ चे कलम ११ व १२ नुसार दोषी धरून आरोपीस २ वर्षे सक्त मजुरी व रूपये ५,००० / - रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.

       सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे शिंदे यांनी पाहिले . घटनेची थोडक्यात हकीगत की , दिनांक १८.०६.२०२२ रोजी फिर्यादी यांनी त्यांची मुलगी वय वर्षे १४ हि घरातून निघून गेलेबाबत भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती . त्यानुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी भा.द.वि. कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला . त्यानंतर पो.हे. कॉ . गोर्डे यांनी घटनेचा तपास करून पिडीत मुलीचा पोलिसांनी शोध घेतला असता , ती आरोपी नामे रेहान उर्फ मोहम्मद अंजर रिजवान शेख याचे सोबत मिळून आली . पोलिसांनी तिचा जबाब घेतेवेळी तिने सांगितले की , आरोपीने मला बळजबरीने तुझ्याशी लग्न करावयाचे आहे माझे बरोबर चल असे म्हणून तिला नातेवाईकाचे घरी घेवून गेला. तिथे राहत असताना तिचा विनयभंग केला असल्याची माहिती तिने दिली.   पिडीत मुलीचा जबाब घेतल्यानंतर पिडीत ही अल्पवयीन असल्याने सदर गुन्हयामध्ये वाढीव कलम लावण्यात आले. त्यानंतर घटनेचा संपूर्ण तपास पोलिस पोलिस उपनिरीक्षक एम. के. बेंडकोळी यांनी करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

      या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये अल्पवयीन पिडीत मुलगी , पिडीत मुलीचे वडील , पंच साक्षीदार, तपासी अधिकारी , वयासंदर्भात मुख्याध्यापक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच आलेला पुरावा ग्राहय धरून आरोपीस मा . न्यायालयाने वरिल प्रमाणे शिक्षा ठोठावली. सदर खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे - शिंदे यांनी पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी आर. व्ही. बोर्डे यांनी सहकार्य केले.  अहमदनगर 
ता . ०४/०५/२०२३
 ( अॅड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
 विशेष सरकारी वकील , अहमदनगर . 
मो . ९ ८५०८६०४११,८२०८ ९९ ६७ ९ ५ -

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close