वडार समाज संघाला मिळाले लेखी आश्वासन
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ४ / वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य यांचेवतीने अहमदनगर पाटबंधारे विभाग यांच्या मनमानी कारभारा विरोधात सोमवार दि.१ मे २०२३पासून उपोषण करण्यात आले .
मा.अधीक्षक अभियंता नाशिक पाटबंधारे मंडळ.नाशिक यांच्या अधिपत्याखाली येणारे अहमदनगर पाटबंधारे विभाग,अहमदनगर येथील कार्यकारी अभियंता श्री.नान्नोर साहेब व त्यांच्या नियंत्रणा खाली काम करणारे देवळाली प्रवराचे उप अभियंता श्री.थोरे साहेब,अकोला पा.बं. उपविभागाचे श्री जोर्वेकर साहेब,लोणी प्रवरा उजवा कालव्याचे उप अभियंता श्री.पावटेकर साहेब,मुळा कर्म शिर्षचे उप अभियंता श्री शिंदे साहेब,वडाळा पा.बंधारे उपविभागाचे श्री कलापुरे साहेब,व इतर उपविभागिय अभियंता यांच्या अधिपत्याखाली काम करणारे सर्व शाखाधिकारी यासर्वांनी काही सबंधित ठेकेदारांशी आर्थिक मिली भगत करुन अंदाजपत्रकानुसार कामे न करताच थातूर- मातूर निकृष्ठ कामे करुन मोठ्या प्रमाणात बोगस पध्दतीने बीले काढुन शासनाची व जनतेची मोठ्या प्रमाणात दिशाभूल व फसवणूक केली आहे.या सर्वांनी माहिती अधिकारात माहिती मागितल्यानंतर आजपर्यंत कोणालाही माहिती दिली नाही.अनेक माहिती अधिकार कार्यकर्ते यांना माहिती न देता दबावतंत्र वापरून माहिती मिळाली असे लिहून घेतल्याचे कार्यालयात आढळून येते.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक मजूर सोसायट्यांनी कामासाठी मागणी पत्राने मागणी केलेली असताना देखील त्या मजूर सोसायट्यांना नियमाप्रमाणे कामे न देता ठराविकच आर्थिक मिलिभगत करणार्या मजूर सोसायट्यांना मोठ्या प्रमाणात कामे देण्यात आली आहेत. असे या ठिकाणी सर्रास आढळून येते.वडार समाजाचा जलसंपदा व पाटबंधारे विभागाशी हे सर्व कामे करण्याचा पुर्वेइतिहास असताना वडार मजूर सोसायट्यांना वर्षानुवर्षे कामे देण्यासाठी नेहमी टाळाटाळ केली जाते. वरील सर्व अधिकारी व शाखाधिकारी यांची प्रामाणिक अधिकारी यांची त्रिस्तरीय कमेटी नेमून सदर अधिकारी यांची खातेनिहाय सखोल चौकशी करुन दोषी आढळल्यास त्यांचे वर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करुन निलंबन करण्यात यावे त्याचप्रमाणे वरील सर्व अधिकारी व शाखाधिकारी यांच्या चल-अचल संपत्तीची लाॅकर्समध्ये असलेल्या संपत्तीची व मालमत्तेची गुन्हे अन्वेषण व अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) मार्फत तातडीने खातेनिहाय चौकशी करण्यात यावी यासाठी उपोषण करण्यात आले .
यावेळी श्री.रामचंद्र मंजूळे -पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष-वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य.
श्री.रमेश जेठे (संपादक व पत्रकार) प्रदेश सचिव-वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्य.
श्री.सागर धनवटे - अहमदनगर जिल्हा सचिव -वडार समाज संघ.श्री.तुकाराम गुंजाळ - मा.सरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री.मोहनराव गायकवाड- सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र ननवरे,संजय डुकरे, मिनानाथ माने,किरण तागडकर,ज्ञानेश्वर जंगम, लक्ष्मण धोत्रे व इतर वडार समाज कार्यकर्ते आदी कार्यकर्ते यांनी दोन दिवसाचे उपोषण केले. त्यानंतर अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री नान्नोर यांनी वडार मजूर सोसायट्यांना प्राधान्याने काम देऊ असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले.

