shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावड्याच्या बारावीचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल.


श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ  महाविद्यालय बावड्याच्या बारावीचा विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल.
बावडा प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२३ इयत्ता १२ वी परिक्षेचा निकाल २५ मे २०२३ रोजी जाहिर झाला .
 श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ  महाविद्यालय बावडा  इयत्ता बारावीचा निकाल कला शाखा ९८%, विज्ञान शाखा १००%, एमसीव्हीसी शाखा ९८% निकाल लागला.
   यशस्वी विद्यार्थ्यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच उपाध्यक्ष मनोज पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, संस्थेचे सचिव किरण पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दशरथ घोगरे ,उपप्राचार्य पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

    कला शाखेत प्रथम सय्यद रेशमा राजवल्ली ७५.६७ टक्के, द्वितीय  चव्हाण सुहानी धनराज ७४.०० टक्के, तृतीय बरकडे ऋतुजा दत्तात्रेय ७३.८३ टक्के मिळवले.

      विज्ञान शाखेत प्रथम वाघमोडे श्रीराम बापूराव ९०.१७टक्के, द्वितीय माने कल्याणी तुकाराम ८९.१७ टक्के, तृतीय पाटील वीरेंद्रसिंह दिनेश ८४.०० टक्के. तसेच या शाखेतील पीक विज्ञान विषयात २०० पैकी २०० गुण पंधरा विद्यार्थ्यांनी मिळवले  आणि पिक उत्पादन विषयांमध्ये १०० पैकी दहा विद्यार्थ्यांनी ९९ गुण मिळवले.

    एमसीव्हीसी विभागामध्ये प्रथम मोरे गायत्री बाळासो ७९.६७%, द्वितीय कांबळे गौरी विकास ७७.६७%, तृतीय कदम साक्षी विजय ७६.६७% गुण संपादन करून यशस्वी झाले.

close