shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रलंबीत मार्जीन लवकरच बँक खात्यात वर्ग होणार - हेमलता बडे



अहमदनगर (प्रतिनिधी) :
स्वस्त धान्य दुकानदारांनी शासकीय योजनांचा लाभ सर्वाँपर्यत पोहचविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावनी करावी. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी चांगले काम करावे, कुणाची ही तक्रार येणार नाही याची काळजी घ्यावी. धान्य दुकानदारांचे मार्जीन लवकरच संबधीत स्वस्त धान्य दुकानदारांचे बँक खात्यावर वर्ग केले जाईल अशी ग्वाही अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदारांच्या जिल्हास्तरीय बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे यांनी दिली. 
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठकीत त्या बोलत होत्या.
 
यावेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, जिल्हा सचीव रज्जाक पठाण, प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश उभेदळ, जिल्हाउपाध्यक्ष विजयराव दिघे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, सुखदेव खताळ, सुरेश नांगरे, आत्माराम कुंडकर, डी.एस.वहाडणे, बाबासाहेब कराड, काशिनाथ आरगडे आदि प्रमुख उपस्थीत होते.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे नव्याने जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून हजर झालेल्या हेमलता बडे यांचे स्वागत व सत्कार समारोह प्रसंगी जिल्हा संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संघटनेच्यावतीने माहे एप्रील ते माहे मार्च पर्यंत वाटप केलेल्या धान्याचे मार्जीन प्रलंबीत आहे, कॅरीफॉरवर्ड वाटप झालेल्या धान्याचे पुर्णत: मार्जीन मिळणे बाकी आहे. तसेच गेल्या वर्षीच्या माहे एप्रील ते डिसेंबर पर्यंतच्या धान्याचे कमीशन त्याच बरोबर मे व नोव्हेंबर मध्ये धान्य दुकानदारांनी चलन भरणा करून मोफत धान्याचे वाटप केले त्या वितरणाचे कमीशन दुकानदारांना मिळणे बाक़ी आहे तसेच जानेवारी २०२३ पासून  मोफत वितरण केलेल्या धान्याचे कमीशन दुकानदारांना मिळाले नसल्याचे निवेदनाद्वारे श्रीमती बडे यांचे निदर्शनास आणुन दिले. त्याच बरोबर अनेक तालुक्यात गोण्यांचे वजन कमी भरत आहे, दुकानात माल टाकताना हमालांकडून दुकानदारांची अडवणुक करून हमाली वसुल केली जाते, नगर शहरात एप्रील महिण्याचे धान्य प्राप्त झालेले नाही ते त्वरीत प्राप्त व्हावे. अनेकांचे प्राधिकारपत्र नुतणीकरण प्रलंबीत आहे अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. 
त्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी व सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लवकर दुकानदारांचे मार्जीन बँक खात्यावर वर्ग केले जाईल तसेच एक आठवड्यात सर्वंच प्रलंबीत मार्जीन ही संबधीत दुकानदारांचे बँक खात्यावर वर्ग होईल, प्रधिकार पत्र नुतणीकरणाचे अनेक तालुक्याकडून परीपुर्ण अहवाल नसल्याने ते मागे असले तरी लवकरच संबधीत तालुक्यांकडून त्याची पुर्तता करून घेण्यात येईल. मे २०२२ व डिसेंबर २०२२ मध्ये दुकानदारांनी भरलेल्या रकमेचे प्रस्ताव अनेक तालुक्यांकडून प्राप्त झालेले नाही ते प्राप्त झाल्यानंतर मंत्रालयाकडे सदरचे प्रस्ताव मंजूरीसाठी जावून तीही रक्कम अदा करणार असल्याचे यावेळी श्रीमती बडे यांनी सांगीतले.

यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, चंद्रकांत झुरंगे, रज्जाक पठाण, सुरेश उभेदळ, अजीज शेख आदिंनी चर्चेत सहभाग नोंदविला. यावेळी प्रकाश भोसले, मुनीर देशमुख, नानासाहेब वाकचौरे, राजेंद्र थोरात, राजेंद्र शेळके, नंदराज शिंदे, शामराव गुंजाळ, लक्ष्मण ससाणे, अशोक भिटे, अवधुत लोखंडे, आकाश टेपाळे, रमेश मोरे, त्रिंबक सोमवंशी आदिंसह संघटनेतील जिल्ह्यातील पदाधिकारी उप्थीत होते.

अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे यांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्याचे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, सुरेश उभेदळ, विजयराव दिघे, बजरंग दरंदले, सुखदेव खताळ, सुरेश नांगरे, आत्माराम कुंडकर, डी.एस. वहाडणे, बाबासाहेब कराड, काशिनाथ आरगडे आदिंसह पदाधिकारी दिसत आहेत. (छाया - चंद्रकांत झुरंगे

समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
close