shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ग्रामपंचायत पीटकेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

ग्रामपंचायत पीटकेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी.

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार वर्षा सुखदेव भोसले व मीरा जाधव यांना देऊन सन्मानित.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या  जयंती निमित्त मौजे पिटकेश्वर गावातील ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर  बारावचे पूजन.

इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त ग्रामपंचायत पिटकेश्वर कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार वर्षा सुखदेव भोसले आणि मीरा जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ वी जयंती निमित्त मौजे पिटकेश्वर गावातील ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर  बाराव याचे पूजन सरपंच सौ सुनीता भोसले यांच्या हस्ते करत जयंती साजरी करण्यात आली.
 याप्रसंगी सचिन अभंग ग्रामपंचायत सदस्य,  नामदेव  किरकत, संचालक निरा भिमा सहकारी कारखाना, अंकुश म्हस्के मा.ग्रामपंचायत उपसरपंच , हनुमंत भोसले सामाजिक कार्यकर्ते, ग्रामसेवक  एस आर गायकवाड, उमेश मोरे,सुभाष येरळकर,संदिप जाधव,सौ.मिराबाई जाधव, वर्षा भोसले, सुजाता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
close