प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २८ / सोशल मीडिया फेसबुकवर ( निळू भाऊ फुळे अफ्रिकन वासी भाजीपाला वाले ) या ग्रुप वर एका राजकीय पक्षाशी निगडीत नेत्याची पोस्ट दि .२१ मे २०२३ रविवार रोजी सायंकाळी ८.५६ वाजल्याच्या सुमारास टाकण्यात आली होती .त्या पोस्टच्या खाली दिलीप शेळके यांनी कमेंट करत असताना मेहतर वाल्मिकी समाजाविषयी जातिवाचक आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडिया वर केल्याने मेहतर वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत .
(कोणी लिहिले आहे त्याच्या सगळ्या खानदानी भंग्याच्या असतील कडू )अश्या प्रकारची जातिवाचक टिप्पणी दिलिप शेळके या व्यक्तीनी केली आहे . दिलिप शेळके हा व्यक्ती कोण आहे प्रशासनाने त्या व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्या व्यक्तीवर कडक कारवाई करून ॲट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा कारवाई न झाल्यास अखिल भारतीय मेहतर समाज संघटना व संपूर्ण दलित समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल.असे निवेदन अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने मा.जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले .
या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनीभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, जिल्हा सचिव दिपक नकवाल विक्रम चौहान,जिल्हा उपसचिव संजय खरे,पवन सेवक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

