shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक ला भेट देऊन करण्यात आले अभिवादन..!

अकोले:- हरित वारी, निर्मळ वारी या संकल्पनेतून संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी अकोले तालुक्यातील अनेक गावी भेटी दिल्या. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे स्मारक ला भेट देऊन अभिवादन केले.


ब्राह्मणवाडा, कोतुळ, शेंडी, राजूर, पळसुंदे या ठिकाणी मोरे महाराज यांनी नागरिकांशी संवाद साधला. संत तुकाराम महाराज यांचे " वृक्षा वल्ली आम्हा सोयरे वनचरे " या वचना प्रमाणे  निर्मळ वारी बरोबरच  हरित वारी होणे गरजेचे आहे. पर्यावरणाची जैव साखळी अबाधित राहण्यासाठी देशी वृक्ष लागवड केली पाहिजे. पिंपळ, वड,लिंब या सारखे वृक्ष लागवड करावे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य पाहिजे असे आवाहन केले.

देवगांव येथे आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राघोजी भांगरे यांचे वंशज उपस्थित होते. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे  वारकरी होते. पंढरपूर च्या वारीत च त्यांना पकडले. आज हिच परंपरा त्यांचे वंशज चालवत आहे. पंढरपुरची वारी हे सर्व न चुकता करतात. याबद्दल समाधान व्यक्त करित ह.भ.प शिवाजी महाराज मोरे यांनी आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचे वंशजांच्या घरी ही भेट दिली व आदिवासी पद्धतीचे भोजनचा आस्वाद घेतला. सर्वांना देहूला येण्याचे आमंत्रण दिले. 

यावेळी भांगरे कुटुंबाचा विठ्ठल रुक्मिणी ची मूर्ती भेट देऊन सन्मान केला. तर भांगरे कुटूंबीयानी टोपी, टॉवेल, हार अन राघोजी भांगरे यांची प्रतिमा भेट देऊन सन्मान केला.
close