काटी ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने छायाताई पडसळकर व रेखा सोलणकर सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: काटी (ता- इंदापूर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या महिला बालकल्याण विभागातील उत्कृष्ट कर्तुत्वान महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने आज दिनांक ३१ मे २०२३ रोजी काटी ग्रामपंचायतच्या वतीने प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. व यानंतर छायाताई पडसळकर ,सौ.रेखा सोलणकर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी सरपंच सौ.तृप्ती वाघमोडे,बोराटे मॅडम , हेमंत पाटील, सुनील लवटे ,अमित मोहिते, लोखंडे सर, गिरीश वाघमोडे ,दादा भोसले सचिन वाघमोडे, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

