shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*श् क्षेत्र नागाई (श्री नागेश्वरी )माता चरणी साक्री तालुक्यातील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्याची श्री दुर्गा सप्तशती १११ पाठ वाचन करून सेवा रुजू


सामोडे - (श्री दिलीप घरटे प्रतिनिधी):
 साक्री तालुक्यातील पिंपळनेर,सामोडे,दहिवेल, साक्री,मालपूर,विटाई तसेच इतर सर्व केंद्रातील सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन साक्री तालुक्यातील प्रसिद्ध तिर्थक्षेत्र श्री नागाई येथील राजराजेश्वरी नागाई माता यांची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशती पाठ सामुदायिक वाचन घेण्यात आले.


या सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचनास १११ महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला.पाठ वाचन करून श्री क्षेत्र नागाई मंदिर व परिसराची स्वच्छता केली.श्री स्वामी समर्थ अध्यात्म व बाल संस्कार केंद्र व ग्राम अभियान या संदर्भात उपस्थित सेवेकरी व देवदर्शना करीता उपस्थितांना सामोडे, साक्री,व  पिंपळनेर केंद्राच्या प्रतिनिधीनी मार्गदर्शन केले.
close