shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अण्णासाहेब धोत्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्यकारणी निवडीसाठी चाकण व शिरूर येथे भेटी.

अण्णासाहेब धोत्रे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या कार्यकारणी निवडीसाठी चाकण व शिरूर येथे भेटी.

इंदापूर प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी असाच धोत्रे यांची निवड झाल्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी संघटना बांधणी करण्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर व चाकण या तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी दौरा काढला असून
 दिनांक १५मे २०२३ रोजी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विमुक्त भटक्या जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष  अण्णासाहेब धोत्रे यांनी चाकण या ठिकाणी विधीतज्ञ गोविंदा अर्जुन राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भटक्या विमुक्त  जमाती सेलचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष  यांची भेट घेत  त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खेड तालुक्याचे तालुकाध्यक्ष  कैलासराव सांडभोर यांच्याशी संपर्क साधून भटक्या विमुक्त  जमाती सेल चा खेड  तालुकाध्यक्ष तसेच खेड तालुक्यातील तीनही नगरपरिषद यांचे शहर अध्यक्ष नेमणे व जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणामध्ये  भटक्या विमुक्त जाती जमाती सेलची जम्बो कार्यकारिणी नेमणे अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाल्याची तसेच शिरूर तालुका भटक्या विमुक्त जाती जमातीच्या कार्यकारणी निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष वाढीसाठी शुभेच्छा व इतर कार्यकर्ते यांच्या समोर बैठक झाल्याची माहिती अण्णासाहेब धोत्रे यांनी दिली.
या भेटी प्रसंगी  हनुमंत पाटील,राहुल शिंदे,शाहरुख शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती त्यांनी सांगितली.
close