काटी ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने छायाताई पडसळकर व रेखा सोलणकर सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी: काटी (ता- इंदापूर) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभाग यांच्यावतीने राबविण्यात आलेल्या महिला बालकल्याण विभागातील उत्कृष्ट कर्तुत्वान महिलांचा सन्मान व्हावा या उद्देशाने आज दिनांक ३१ मे २०२३ रोजी काटी ग्रामपंचायतच्या वतीने इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर , अंगणवाडी सेविका सौ.रेखा सोलणकर यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमा प्रसंगी गटविकास अधिकारी बारामती आणि कृषी विस्तार अधिकारी बारामती,सरपंच सौ.तृप्ती वाघमोडे,बोराटे मॅडम , हेमंत पाटील, विपुल वाघमोडे, सुनील लवटे ,अमित मोहिते, लोखंडे सर, गिरीश वाघमोडे ,दादा भोसले सचिन वाघमोडे, रेखा सोलंकर, ग्रामसेवक व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

