shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिव्यांग बांधवांचे जीवन कष्टमुक्त करण्याची संधी पंतप्रधान मोदीजींमुळे - खा प्रितम मुंडे


============================
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                       दिव्यांग बांधवांचे जीवन कष्टमुक्त करणारी ही योजना आपल्या जिल्ह्यात कार्यान्वित करण्याची संधी आम्हाला देशाचे पंतप्रधान मा मोदीजींमुळे मिळत असल्याने त्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत अशी भावना खा प्रीतम मुंडे यांनी  केंद्र सरकारच्या एडीपी योजनेअंतर्गत सामाजिक न्याय मंत्रालय , दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने  केज उपजिल्हारुग्णालयात आयोजित मोफत दिव्यांग तपासणी शिबिरात दिव्यांगांशी संवाद साधताना व्यक्त केली.
       


यावेळी आ नमिता मुंदडा, नंदकिशोर काकाजी मुंदडा,अंकुश अण्णा इंगळे,नेताजी शिंदे , सुनील गलांडे,डॉ वसुदेव नेहरकर , महादेव सूर्यवंशी , भगवान केदार , विष्णू घुले , सुरेंद्र तपसे , राहुल गदळे.संतोष जाधव अतुल इंगळे यांची विशेष उपस्थिती होती  . समाजातील वंचित, गरजू लोकांची सेवा करण्याचा आमचा मानस होता. यानिमित्ताने दिव्यांग बांधवांची सेवा करण्याचे परमभाग्य लाभत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी निराधारांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, त्या योजना तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे माझी जवाबदारी आहे. दिव्यांग बांधवांचे जीवन कष्टमुक्त करणारी ही योजना आपल्या जिल्ह्यात कार्यान्वित करण्याची संधी आम्हाला मोदीजींमुळे मिळत आहे, यासाठी त्यांचे देखील अनेक आभार यानिमित्ताने त्यांनी मानले. 
             

या वेळी शिबिरात 189 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली .त्यांना लवकरच साहित्याचे वाटपदेखील करण्यात येणार आहे . शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ वसुदेव नेहरकर ,  भगवान केदार , सौ जयश्री गदळे , सुरेश नांदे सर , महादेव सुर्यवंशी,डॉ धनराज पवार यांनी परिश्रम घेतले.
close