इंदापुरात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.
इंदापूर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करून केला साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते व वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने सामाजिक उपक्रमातून डॉ. नामदेव गार्डे, सतिश व्यवहारे सर यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय इंदापूर या ठिकाणी रुग्णांना फळ वाटप करून साजरा करण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे माजी पुणे जिल्हा सचिव हनुमंत कांबळे, वंचित बहुजन महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई चंदनशिवे,सुनीता चंदनशिवे, प्रमोद चव्हाण,पवन पवार,सिद्धार्थ साळवे,हमीदभाई अत्तार, गवळी रावसाहेब,बापू नाचन, सागर चंदनशिवे, डॉ. नवनाथ पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

