श्रीरामपूर प्रतिनिधी:
लोयोला चर्च अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून लोयोला संदेश हे नियतकालिक सुरू आहे याच नियतकालिकाच्या संपादकीय मंडळा कडून श्रीरामपूर तालुक्यातील ख्रिस्ती नवोदित कवी लेखकांना साहित्य निर्मितीच्या दृष्टीने अधिक मार्गदर्शन मिळावे म्हणून तालुकास्तरीय लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगमनेर येथील ज्येष्ठ साहित्यिक व आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात व ज्येष्ठ लेखक लॉरेन्स जी. हे उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रा.खरात म्हणाले की, साहित्य सर्व समावेशक असावे, माणसाला माणसाशी जोडते तेच खरे साहित्य असते. तुम्ही ही येणाऱ्या काळात असेच लेखन करून एकसंध भारत निर्माण करावा असा सल्ला ही त्यांनी नवोदित साहित्यिकांना दिला.
कार्यक्रमा दरम्यान लोयोला संदेश नियतकालिकाचे मुख्य संपादक फादर ज्यो गायकवाड यांच्या हस्ते ज्येष्ठ कवी लेखकांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र ही देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवि त्रिभुवन यांनी केले तर सूत्रसंचालन कमलाकर पंडित यांनी केले शेवटी मंगल दुशिंग यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लोयोला संदेश संपादकीय मंडळ,पॅरिश कौन्सिल, युवक मंडळ, महिला मंडळ, ले-मिशनरी, फा. हान्स स्टाफनर प्रतिष्ठान व गायन मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर

