shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पटारे यांचे काम उल्लेखनिय- अनुराधा आदिक

शिरसगांव (वार्ताहर) श्रीरामपूर - येथील नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी शिक्षण मंडळाच्या शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, विविध उपक्रम विद्यार्थीसंख्या वाढीसाठी भौतिक सुविधा बाबतीत गेल्या पाच वर्षांपासून उल्लेखनीय कामगिरी केली असून कोरोना काळात नगरपालिकेला उत्तम सहकार्य केले आहे त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार श्रीरामपूर नगरपालिकेच्या लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी कविटकर होते.


यावेळी श्रीरामपूर विधानसभेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी गटविकास अधिकारी शाम पुरनाळे, माजी गटशिक्षणिधिकारी के.पी. बोरुडे, सुभाष पवार, भैरवनाथ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त  सरपंच भारत तुपे, राज्य संघाचे सल्लागार नवनाथ अकोलकर, श्रीरामपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजीवन दिवे, माध्यमिक शिक्षक सोसायटी अहमदनगरचे ज्येष्ठ संचालक सूर्यकांत डावखर,जिल्हा संघाचे अध्यक्ष फारूकभाई शाह, विजय शेळके, शहर अध्यक्ष सचिन शिंदे, ताराचंद पगारे ,शिवाजी भालेराव इकबाल काकर,  मुख्याध्यापक सलीमखान पठाण ,प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक बाळासाहेब सरोदे  रूपेश गुजर, किशोर त्रिभुवन, संभाजी त्रिभुवन, कोपरगाव शिक्षण मंडळाचे अमित,भिवंडी येथील काकडे , शरद नगरगोजे, आदि मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे , कचरु बोरुडे ,शाम पुरनाळे,सुभाष पवार, संजीवन दिवे, बाळासाहेब सरोदे, सलिमखान पठाण, ऋषी पटारे,संगमनेरयेथील केंद्र प्रमुख जाधव,लताऔटी अजय शिंदे मुख्याध्यापिका श्रीमती पैठणे ,  अ.दि.मुळे शाळेच्या शिक्षिका श्रीमती अमृता अकोलकर ,अल्ताफ शाह, सेवानिवृत्त संघाचे प्रताप देवरे,राहूरी पालिका शाळेतील शिक्षक  कांबळे, खाजगी शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे दिनेश तरटे, भारत तूपे, आदिंनी मनोगत व्यक्त केले 

सत्काराला उत्तर देताना प्रशासनाधिकारी ज्ञानेश्वर पटारे यांनी श्रीरामपूर नगरपालिकेच्या शाळेमध्ये काम करताना नगरपालिकेतील शिक्षक, शिक्षण मंडळाचे कर्मचारी, खाजगी माध्यमिक, प्राथमिक शाळेतील शिक्षक , संस्थेचे पदाधिकारी, पालिकेतील पदाधिकारी, अधिकारी ,कर्मचारी ,तसेच पंचायत समितीचे शिक्षण विभागाकडून उत्तम सहकार्य मिळाले यामुळेच मी चांगले काम करु शकलो. नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविता आले याचे समाधान आहे.


यावेळी महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाने भेट वस्तू देवून पटारे  यांचा विशेष सपत्नीक सत्कार केला, नगरपालिका शाळा,  खाजगी शाळां,विविध संस्था, नातेवाईक यांनी पटारे यांचा सत्कार केला.

कार्यक्रमासाठीअधिकारी पदाधिकारी, शिक्षक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व नगरपालिका व खाजगी मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग शिक्षण मंडळ कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ अकोलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ऋषी पटारे यांनी मानले.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
close