शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था या संस्थेच्या कार्याची दखल फक्त शिर्डीच नव्हे तर जिल्हाभर घेतली जाते.या संस्थेकडे एक आदर्श संस्था म्हणून बघितले जाते. सामाजिक कार्याची आवड असलेले संस्थापक अध्यक्ष मा.श्री महेमुदभाई दिलदार सय्यद यांनी सामाजिक कार्याचा शुभारंभ 2013 मध्ये त्यांच्या मित्र व सहकाऱ्यांच्या मदतीने आरंभ केला शिर्डी शहरात साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांनी संस्थेच्या वतीने वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सर्वधर्मीय रूग्णांना मदत केली.व संस्थेच्या वतीने निरंतर रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.अनेक गरजू रुग्णांसाठी दोन रुग्णवाहिका संस्थेच्या वतीने अतिशय अल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत..
कालांतराने काही मित्र व सहकारी त्यांच्या वयक्तिक व्यवसायाच्या व्यस्ततेमुळे दुरावत गेले. तरी महेमूद सय्यद यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालूच ठेवले व त्यांच्या मदतीला सामाजिक कार्याची आवड असलेले नवीन मित्र धावून आले तेव्हापासून महेमुद सय्यद व त्यांच्या संस्थेने मागे वळून पाहिलेच नाही. त्याचेच फळ म्हणून भारतरत्न dr. ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेला जिल्हाभर प्रसिद्धी मिळत आहे. 2017 मध्ये मा.नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचे खंदे समर्थक व महेमुद सय्यद यांचे मार्गदर्शक मौलाना अजगरअली सय्यद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने शिर्डी शहरातील मुस्लिम समाजावर व मेहमूद सय्यद यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला या घटनेतून खचून न जाता सय्यद यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी जवळीक साधून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व स्थानिक पातळीवर कैलास बापू कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मित्र सहकारी यांच्या मदतीने संस्थेचे समाजकार्य चालू ठेवले मौलाना अजगरअली सय्यद यांचे स्वप्न होते की मुस्लिम समाजातील इस्तेमाइ शादीया म्हणजेच सामुदायिक विवाह सोहळा शिर्डी शहरातही झाला पाहिजे हे त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न संस्थेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा निश्चय महेमुदभाई सय्यद यांनी केला व 2018 मध्ये इज्तेमाई शादीया सामुदायिक विवाह सोहळा चे आयोजन केले व कोरोना काळ सोडला तर दरवर्षी इज्तेमाई शादीयाचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून केले जाते आजपर्यंत 45 ते 50 जोडप्यांनी याचा लाभ घेतलेला आहे व त्यांचे आशीर्वाद संस्थेला व महेमुदभाई सय्यद यांना लाभलेला आहे. कोरोना काळात पाई चालणारे परप्रांतीय मजूर यांच्यासाठी पाणी व नाश्त्याचे व जेवणाचे बंदोबस्त केले शिर्डी शहरातील पुनमनगर श्रीरामनगर इस्लामनगर नाला रोड, या उपनगरांमध्ये कोरोना काळात किमान 500 कुटुंबांना वेळोवेळी किराणा किट व भाजीपाला किट चे वितरण केले कोरोना काळात नागरिकांचे हाल बघता शिर्डी व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी दोन्ही रुग्णवाहिका स्वतःच्या खिशातून पेट्रोल टाकून मोफत उपलब्ध करून दिली दरवर्षी उन्हाळ्यात साईभक्त पालखी पदयात्रीन साठी पाणपोई ची व्यवस्था संस्थेकडून करण्यात येते वेळोवेळी रक्तदान कॅम्पच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास 600 ते 700 बॅग उपलब्ध करून दिले.
महेमुदभाई सय्यद यांच्या चार चाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये नेहमी गरजू मुलांसाठी व महिलांसाठी साड्या व कपडे असतात ते नेहमी प्रवासादरम्यान रस्त्यालगत गरजवंतांच्या वस्तीवर जाऊन मुलांसाठी व महिलांसाठी साडी व कपडे देत असतात .उज्वला गॅस योजनेचा लाभ कसा घ्यावा हे गरजवंतांना माहीत नसल्यामुळे संस्थेच्या माध्यमातून सर्वांचे फॉर्म भरून जवळपास 200 कुटुंबांना उज्वला गॅस योजनेचा लाभ मिळवून दिला त्या 200 कुटुंबाचेही आशीर्वाद संस्थेला लाभलेले आहे संस्थेच्या वतीने दर दिवाळी व रमजान ईद निमित्त फराळ मिठाई वाटून सण साजरा करण्यात येतो असे एक ना अनेक काम संस्थेच्या वतीने कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता करण्यात येते व यापुढेही संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने चालू राहतील संस्थेचा मानस आहे की जर सर्वांनी साथ दिली तर एक अनाथ आश्रम एक मॉर्डन शाळा व वृद्धाश्रम व बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन हे सर्व उद्दिष्ट आपण पार पाडू संस्थेच्या विविध कामांसाठी सर्व सहकारी हाजी समसुद्दीनभाई,अशरफभाई सय्यद,दादाभाई इनामदार ,मुख्तारभाई सय्यद, साजिदभाई शेख, अनवर(पापा)शेख,बरकतभाई सय्यद,अखलाख खान,जलील पठाण,मोहसीन सय्यद,निसार रज्जाक शेख,आदिल कुरेशी,अर्शद शाह,गुलामरसुल शेख,मतीन सय्यद, अमीर खान,नदीम असगर अली,साहिल बागवान, तय्यब शेख, तौहीद पठान,आदिल पठान, कय्यूम असगरअली,व इतरांचे सहकार्य लाभत असते या पवित्र कामासाठी शिर्डी व परिसरातील सर्व धर्मीय नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभत असतात. सबका मालीक एक अशी शिकवण देणाऱ्या शिर्डी च्या पावन भूमीत सर्वधर्मीय गरजवंत नागरिकांसाठी संस्थेच्या माध्यमातून मोफत कफ़न,अंत्यविधी केली जाते.नागरिकांची देणगी देण्याची क्षमता असूनही या पुंन्याच्या कामाला देणगी देत नाही याचि खंत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महमूद भाई सय्यद यांनी बोलून दाखवली.क्षमता असलेल्यांनी अशा पवित्र व आशीर्वादाच्या कामात सहकार्य केले पाहिजे.

