shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय जनता पार्टी शिर्डी लोकसभा निवडणूक 2024 च्या निवडणूक प्रमुख म्हणून भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची निवड


शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 राजकीय बातमी 

शिर्डी :- भारतीय जनता पार्टी शिर्डी लोकसभा निवडणुक २०२४ च्या निवडणुक प्रमुख म्हणून भाजपा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांची निवड झाली आहे.
     भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा व विधानसभा प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शिर्डी लोकसभा हा अनुसूचित जाती साठी राखीव आहे.

         

शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचे निवडणुक प्रमुख म्हणून राजेंद्र गोंदकर,  विधानसभा निहाय प्रचार प्रमुख म्हणून पूढील प्रमाणे अकोले - वैभवराव पिचड, संगमनेर - सतीश कानवडे, राहता - रघुनाथ बोठे, कोपरगाव - सौ. स्नेहलता कोल्हे, श्रीरामपूर - नितीन दिनकर, नेवासा - बाळासाहेब मुरकुटे श्री. राजेंद्र गोंदकर हे तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या कार्यकाळात भाजपाचे काम वाढविले असून नवे जुने कार्यकर्त्या चा मेळ घालून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. बूथ सशक्तीकरण अभियान   मध्ये अतिशय चांगले काम केले आहे. 

         
श्री. गोंदकर यांच्या निवडीने शिर्डी लोकसभा मतदार संघ भाजपा नक्की जिंकेल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करित आहे.
close