shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा इंदापूर तालुक्यात बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद गटात गाव भेट दौरा - हनुमंत कोकाटे.

 खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा इंदापूर तालुक्यात बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद गटात गाव भेट दौरा - हनुमंत कोकाटे. 

इंदापूर प्रतिनिधी: बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांचा इंदापूर तालुक्यातील बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद गटात सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिली. 

सदर गाव भेट दौऱ्यामध्ये खासदार सुप्रियाताई सुळे गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन गावो-गावातील अडी-अडचणी तसेच विकासकामासंदर्भात नागरिकांबरोबर थेट संवाद साधणार आहेत.या प्रसंगी  आमदार दत्तात्रेय भरणे माजी राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य, प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी-माजी  सदस्य तसेच गावोगावचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे हनुमंत कोकाटे यांनी सांगितले.

 दौऱ्यातील गावे खालील प्रमाणे• 
-----------------------------------------------
सकाळी ८:२० वाजता - नरसिंहपूर
सकाळी ९:१० वाजता - टण्णू
सकाळी १०:०० वाजता - पिंपरी बु.
सकाळी १०:५० वाजता -  गोंदी / ओझरे 
सकाळी ११:४० वाजता - लुमेवाडी 
दुपारी १२:५० वाजता - सराटी 
दुपारी ३:०० वाजता - भगतवाडी 
दुपारी ३:५० वाजता- पिठेवाडी 
सायं ४:४० वाजता - चाकाटी 
सायं ५:३० वाजता -  बोराटवाडी 
सायं ६:२० वाजता - खोरोची 
 
close