shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी.

इंदापूर येथे पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती उत्साहात साजरी.

 विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती निमित्त इंदापूर येथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले. या जयंतीनिमित्त  प्रथमतः धनगरी ओव्यांचा कार्यक्रम घेण्यात आला. नंतर प्रशासकीय, सामाजिक ,राजकीय ,पत्रकारिता, आरोग्य सेवेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली होती, यामध्ये मोठ्या गटात दोन व छोट्या गटात तीन असे पाच बक्षीस देण्यात आली.
 या कार्यक्रमासाठी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील , पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे ,इंदापूर पोलीस निरीक्षक दिलीप पवार, माजी सभापती विलासराव वाघमोडे, नीरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर ,इंदापूरचे मुख्याधिकारी रामराजे कापरे,उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. दीपक चोरमले,जयंती उत्सव समितीचे मार्गदर्शक पांडुरंग मारकड,  युवा नेते दीपक जाधव,  तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात, शिवाजी इजगुडे, शिवाजी तरंगे ,लक्ष्मण देवकाते, पोपट पवार, आप्पा माने, सिताराम जानकर ,अमोल करे ,राहुल गुंडेकर,  सचिन राऊत ,रोटरीचे शेंडे गुरुजी हे व इतर मान्यवर उपस्थित होते. 
तसेच या जयंती उत्सव सोहळ्यास मोहोळचे आमदार यशवंत माने, मार्केट कमिटीचे संचालक मधुकर भरणे,युवा नेते श्रीराज  भरणे व इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

पुरस्कार सोहळ्याप्रसंगी तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले की , इंदापूर मध्ये सर्व  महापुरुषांचे पुतळे एका ठिकाणी बसवण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. याच्यातून सर्व समाज एकत्र येण्यास मदत होईल तसेच आप्पासाहेब जगदाळे विलास  वाघमोडे श्रीराज भरणे यांनी मार्गदर्शन केले, प्रस्ताविक जयंती उत्सव समितीचे निमंत्रक  नानासाहेब खरात यांनी केले.  मान्यवरांचे आभार जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष महेंद्र रेडके यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेचे नियोजन संदीप रेडके, हनुमंत यमगर, गणेश शिंगाडे, दिलीप पाटील ,सुधीर पाडूळे, शांतीलाल भगत, निलेश कवितके, अनिकेत जाधव ,संपत पुणेकर, सचिन सुळ, लक्ष्मण वाघमोडे ,रुपेश वाघमोडे ,संकेत वाघमोडे ,मोरेश्वर कोकरे ,सचिन खामगळ, गोकुळ कोकरे, सागर पवार ,सद्दाम बागवान व इतर युवकांनी केले.

---------------------------------------- 
यावेळी अनिताताई खरात  पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या केलेल्या कार्याची माहिती देत म्हणाल्या की, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने आपले काम प्रामाणिकपणे करत असतात.पण एखादी महिला सामाजिक, राजकीय काम  करत असेल तर तिची पाठीमागे टिंगल टवाळी केली जाते आणि या गोष्टीला कोठेतरी आळा बसला पाहिजे. महिलांना समाजकारणात, राजकारणात प्रोत्साहन देणे हेच  पुण्यश्लोक आहिल्यादेवींना अभिवादन ठरेल.


 अनिताताई खरात 
   संस्थापक/ अध्यक्षा 
तेजपृथ्वी ग्रूप  महाराष्ट्र राज्य .
close