*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी चा परिसर विठ्ठलमय*
विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन
इंदापूर प्रतिनिधी: जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित,विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मध्ये दिनांक २२ जून २०२३ रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेपासून ते लाखेवाडी गावातील श्री विठ्ठल मंदिरापर्यंत श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी काढण्यात आली त्यामध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीमध्ये पालखीची सजावट करून पालखीसोबत संत परंपरेतील विविध संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. त्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम इत्यादी संतांच्या वेशभूषा करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली होती.
सर्व विद्यार्थी ज्ञानोबा------माऊली---- तुकाराम------* जयघोष करत होते. पालखी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता, त्यामध्ये मुलांनी पांढरा नेहरू कुर्ता गळ्यामध्ये टाळ, कपाळाला गंध, हातात भगवी पताका व मुखी माऊली माऊली हा जयघोष चालू होता.
मुलींनी पारंपारिक पद्धतीने मराठमोळी वस्त्र परिधान करून डोक्यावरती तुळस घेऊन हरिनामाचा गजर केला.
संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर व संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. चित्रलेखा ढोले मॅडम या दाम्पत्यांनी पालखीची पूजा व आरती केली.आरतीसाठी संस्थेचे सल्लागा प्रदीप गुरव सर ,पालक वर्ग उपस्थित होते.
पालखी विठ्ठल मंदिरातून आल्यावर शाळेच्या मैदानावरती गोल रिंगण घेण्यात आले, त्यामध्ये पालखी, झेंडेकरी विद्यार्थी, विणेकरी विद्यार्थी , तुळशी डोक्यावरती विद्यार्थिनींचे रिंगण झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सर्व जय भवानी गड विद्या प्रतिष्ठान चा परिसर विठ्ठलमय गजराने घुमत राहिला.
'इहलोकी पालखी सोहळा यापेक्षा कोणताही सोहळा जगभरात मोठा नाही. दैदीप्यमान, नेत्रदीपक सोहळा, डोळ्याचे पारणे फेडणारा, ऊर भरून आणणारा, श्रीमंतच नाही तर गर्भ श्रीमंतसोहळा. जय भवानी गड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी मध्ये साजरा करण्यात आला*
सर्व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे प्राचार्य श्री. सरगर सर, संस्थेचे प्रशासक श्री. गणेश पवार सर, सर्व विभागाचे सुपरवायझर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

