shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सोपान मोरे , ज्ञानदेव शिंदे , श्याम गव्हाळे आणि मुकुंद जोगदंड यांच्या वतीने कुरुळी येथे केली दिंडीतील वारकरी भाविकांची अन्नदान नाश्ता व मुक्कामाची सेवा.

सोपान मोरे ,  ज्ञानदेव शिंदे , श्याम गव्हाळे  आणि मुकुंद जोगदंड  यांच्या वतीने   कुरुळी येथे केली दिंडीतील वारकरी भाविकांची अन्नदान नाश्ता व मुक्कामाची सेवा.
इंदापूर प्रतिनिधी:  सालाबादप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू, आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी पायी दिंडीतील वारकरी भाविकांना कुरुळी , तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक ९जून २०२३ रोजी संध्याकाळी अन्नदान आणि मुक्काम ची सोय उपलब्ध करून १० जून २०२३ रोजी सकाळी नाष्टा आणि चहा ची व्यवस्था करण्यात आली. 
वारकरी भाविकांना अन्नदान सामाजिक कार्यकर्ते  सोपान मोरे  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेल पुणे जिल्हा ,उपाध्यक्ष  ज्ञानदेव शिंदे आणि नाष्टा श्याम गव्हाळे  आणि मुकुंद जोगदंड  यांच्या वतीने करण्यात आले. 

यावेळी प्रमुख उपस्थिती वारकरी मंडळीचे विणेकरी ह भ प  अंबादास जवळेकर, मृदुंग वादक ह भ प  मुरलीधर गायकवाड,दिंडी प्रमुख ह भ प  निवृत्ती महाराज गोडसे, ह भ प  जगन्नाथ भोसले, हभप  किसन कोळपे,अभय पाटोळे, ज्ञानेश्वर जगदाळे, महादेव कोळेकर, मुरलीधर गायकवाड, पोपट थोरात,  सौ मंगल गोडसे, अल्काताई जाधव, नंदाबाई खाडे आणि दिंडी तील सर्व वारकरी मंडळी तसेच,  रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे खेड तालुका अध्यक्ष   स्वप्नील मेदनकर, युवा उद्योजक  युवराज भोसले , ज्ञानेश्वर ताटे, हनुमंत सस्ते, साळुंखे, गणेश कोळेकर, नागनाथ सस्ते, अभिमन्यू मोरे, राणी मोरे, सृष्टी मोरे,दीपाली शिंदे, राधा जोगदंड, वैशाली गव्हाळे, मनीषा मोरे,अंजना कोल्हे, दीक्षा भोरे,  अस्मिता मोरे, सोहम शिंदे, राजविर शिंदे, स्वराज जोगदंड, जीवन भोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
close