श्रीरामपूर प्रतिनिधी
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सोमवार दिनांक २६/६/२०२३ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुनीता गायकवाड यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की राजर्षी शाहू महाराजांनी गरीबांना मदत केली त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली तसेच वस्ती गृहे बांधली, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली, असपृश्य विद्यर्थ्यांच्या शिक्षणासाठी मिस क्लार्क बोर्डिंग वसतिगृह उभारले, सरकारी नोकऱ्यांत मागासवर्गीयांना ५० % जागा राखीव दिल्या. कोल्हापूर संस्थांनात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. राजर्षी शाहू महाराजांनी स्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंद करणारा कायदा केला तसेच घटस्फोटाचा कायदा, देवयानी प्रथा कायद्याने बंद केली. सामान्य माणूस केन्द्रस्थानी माणून त्यांनी राज्यकारभार केला असे मत त्यांनी व्यक्त केले. महाविद्यालयातील प्रा अमीत कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी प्रा दिलीप खंडागळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

