प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :- केज शहरातील प्रद्युम्न नेहरकर याने वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षेत (नीट) ७२० पैकी ६८३ गुण घेत एम. बी. बी. एसच्या वैद्यकीय पदवी शिक्षणासाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी बीड जिल्हा अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती केज चे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर यांचे प्रद्युम्न नेहरकर चिरंजीव आहेत. तसेच त्यांची आई सुद्धा डॉक्टर असून मोठी बहीण एम. बी. बी. एस. शासकीय महाविद्यालय जळगाव येथे सेकंड इयरला शिक्षण घेत आहे.
प्रद्युम्न नेहरकर यांचे आजोबा पदवीधर असून काका कृषी महाविद्यालय परभणी येथे किटकशास्ञ विभागाचे प्रमुख असून काकू देखील पदवीधर आहेत. कुटुंबातील जवळपास सर्व सदस्य पदवीधर आहेत.
डॉ. वासुदेव नेहरकर यांचे चिरंजीव प्रद्युम्न नेहरकर यांचे प्राथमिक शिक्षण स्वामी विवेकानंद विद्दा मंदिर केज येथे झाले असून माध्यमिक शिक्षण श्री देशीकेंद्र विद्यालय लातूर येथे तर कॉलेज चे शिक्षण राजश्री शाहू कॉलेज लातूर येथे झाले आहे. प्रद्युम्न नेहरकर शाहू कॉलेज च्या स्क्रीन टेस्ट मध्ये AllMS बॅच चा विद्यार्थी आहे. बारावी बोर्डाच्या परिक्षेत देखील ९०.५०℅ गुण घेऊन प्रद्युम्न नेहरकर उत्तीर्ण झाला असून JEE main परिक्षेत देखील त्याने ९८.५०% गुण घेऊन केज तालुक्यातील पहिला विद्यार्थी ज्याने की AIIMS ला वैद्यकीय शिक्षण घेऊन भौतिकशास्त्र विषयात १७५ गुण घेऊन सर्व प्रथम आला आहे. प्रद्युम्न नेहरकर च्या या यशाबद्दल त्याचे व डॉ . कुटुंबातील सर्वांवरच कौतुकाचा वर्षाव होत आहे. केज तालुक्यात सर्वञ नेहरकर फॅमिलीचे अभिनंदन होत आहे.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे व खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी प्रदुम्न नेहरकर व कुटुंबाचे अभिनंदन केले आहे तसेच केज मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार नमिताताई मुंदडा, जेष्ठ नेते नंदकिशोर काकाजी मुंदडा व अक्षय भैय्या मुंदडा यांनी प्रद्युम्न नेहरकर च्या यशाबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

