( खर्डा - माळेगाव रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ )
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
रस्त्याच्या मंजुरीसाठी मंत्रालयात टेबल टू टेबल फिरून पाठपुरावा केला. आता रस्त्याचे काम दर्जेदार होणार निधीत गैरव्यवहार होऊ देणार नाही. तुम्ही पाईपलाईनसाठी रस्ता खोदू नका काळजी घ्या असे प्रतिपादन आमदार नमिता मुंदडा यांनी केले.
खर्डा - चौसाळा - साळेगाव - माळेगाव या १६.९९ कि. मी. अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम १३ कोटी रुपयांच्या निधीतून पूर्ण होत असून या कामाचा शुभारंभ आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते मंगळवारी कापरेवाडी ( ता. केज ) येथे करण्यात आला. याप्रसंगी आ. मुंदडा या बोलत होत्या. कार्यक्रमास भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवानेते अक्षय मुंदडा, बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, पं. स. चे माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर, जेष्ठ नेते सुनील गलांडे, कार्यकारी अभियंता स्वामी, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान केदार, बाजार समितीचे उपसभापती डॉ. वासुदेव नेहरकर, माजी सरपंच विष्णू घुले, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी, भाजपचे केज विधानसभा अध्यक्ष शरद इंगळे, लिंबराज फरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. नमिता मुंदडा म्हणाल्या की, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी संधी दिल्यामुळे मतदार संघात जनसेवा करीत आहे. कोविड व महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नाही. मात्र भाजप - शिवसेनेची सत्ता येताच केज - अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी नागरोत्थानमधून सव्वाशे कोटींचा निधी मंजूर करून आणला. मतदार संघातील प्रमुख रस्त्याची कामे करून घेण्यासाठी निधी आणला असून उर्वरित रस्त्याची कामे येणाऱ्या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पूर्वी रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची व कागदावर होत. मात्र आता दर्जेदार कामे करून घेण्याकडे आपले लक्ष असून नागरिकांनी पाईपलाईनसाठी रस्ते न खोदता आपल्या घरातील फरशीप्रमाणे रस्त्याची काळजी घ्यावी. गरजेच्या वेळी ड्रिलचा वापर करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जेष्ठ नेते सुनील गलांडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार डॉ. हनुमंत सौदागर यांनी मानले. कार्यक्रमाला गोरख भांगे, सुनील घोळवे, राहुल गदळे, दगडू दळवे, सा.बां. उपविभाग केजचे उपअभियंता युवराज मळेकर, शाखा अभियंता अतुल मुंडे, सचिन कांबळे, शासकीय गुत्तेदार चंद्रकांत बिक्कड, किरण देशमुख यांच्यासह परिसरातील सरपंच, चेअरमन, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

