shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी ते पंढरपूर पायी साईबाबा पालखी चे प्रस्थान



शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) 
धार्मिक बातमी

श्री साईबाबा संस्थान शिर्डी ने सोळा वर्षांपूर्वी चालू केलेले शिर्डी ते पंढरपूर पायी श्री साईबाबा पालखी सोहळा दिनांक 14 /6 /2023 बुधवार रोजी दुपारी एक वाजता साधू संत महंत च्या व माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील खासदार व  पी शिवा शंकर मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पादुका पूजन होऊन पालखीचे प्रस्थान होणार आहे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानदऺजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व पेरणीने श्री साईबाबा संस्थान शिर्डी व शिर्डी पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत असतो दिनांक 14 /6/ 2023 रोजी दुपारी एक वाजता साई शताब्दी मंडप येथून साईबाबांच्या फोटोची व पादुकांची विधिवत पूजा साईबाबा मंदिर परिसरात सभा मंडपात करण्यात येणार आहे.

 पंधरा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात हजारो भाविक सहभागी होणार आहे दिंडी सोहळा अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने पायी वाटचाल करीत असतो तरी शिर्डी ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी या प्रस्थान सोहळ्यास उपस्थित राहावे असे आव्हान श्री साईबाबा पालखी सोहळा समिती ने केले आहे.
close