shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे रासपच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावात दलित युवकाची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन.

इंदापूर येथे रासपच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावात दलित युवकाची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावात दलित युवकाची निर्गुण हत्या केल्याच्या निषेधार्थ इंदापूर पोलीस स्टेशन येथे(ता.९ जून) इंदापूर पोलीस निरीक्षक यांची नावे निवेदन देण्यात आले.

  सदर देण्यात आलेल्या निवेदनात जाहीर निषेध करत समाजकंटकावर कठोर कार्यवाही व्हावी व सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि हत्या झालेल्या अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून सदर खटला फास्ट कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचे नमूद करण्यात आलेले निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण  गोफणे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा इंदापूर संघटक तानाजी  शिंगाडे , नवनाथ कोळेकर कार्याध्यक्ष  , श्रीनिवास सातपुते इंदापूर शहराध्यक्ष व प्रवक्ते इंदापूर  , राहूल  लोखंडे युवा कार्यकर्ते ,आकाश  पवार अध्यक्ष  युवक आघाडी इंदापूर, सोन्या  जानकर उपाध्यक्ष  युवक आघाडी इंदापूर,गणेश कोकरे ,बालाजी बंडगर, गणेश काशीद,रोहन ओव्हाळ ,दयानंद काळुंके ,कमलेश काळे  व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
close