shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूरात वारकऱ्यांना अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेज इंदापूर, धाराशिव तर्फे मोफत औषध उपचार.

इंदापूरात वारकऱ्यांना अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेज इंदापूर, धाराशिव तर्फे  मोफत औषध उपचार.
इंदापूर प्रतिनिधी:  संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांची पालखी आज इंदापूर शहरांमध्ये दाखल झाली. या पालखी सोहळ्यात पायी चालत प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेज तर्फे  मोफत औषध उपचार सेवा देण्यात आली. 
हजारोच्या संख्येने वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेसचे प्राचार्य आणि सहशिक्षक तसेच नर्सिंग स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप ग्रुप ऑफ कॉलेजेस संस्थापक अध्यक्ष सागर जाधव यांनी ही सेवा अखंड चालू राहील असा विश्वास दिला.
close