shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नूतन नगर तालुका उपनिबंधक महिना उलटून देखील कामावर येत नसल्याचा आरोप- प्रकाश पोटे.

                                   
जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपनिबंधकांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त.   

        
अधिकारी जागेवर भेटत नसल्याचा चकरा मारणार्या नागरिकांचा आरोप..
  
अहमदनगर (प्रतिनिधी)-नगर तालुका उपनिबंधक कार्यालय येथे नागरीक महिन्याभरापासून चकरा मारून वैतागले असून देखील अधिकारी जागेवर भेटत नसल्याने जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने नगर तालुका उपनिबंधक शुभांगी गौड यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आले.

 यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत अमित गांधी, दीपक गुगळे, शहानवाज शेख, शहाबाज शेख, गौतमीताई भिंगारदिवे, मंगलाताई मोरे, रोहिणी पवार, सुरेश कसाब, निलेश सातपुते आदी उपस्थित होते.       

सामाजिक कार्यकर्ते व जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे हे काही कामानिमित्त मागील एक महिन्यापासून नगर तालुका येथे नव्याने रुजू झालेल्या तालुका उपनिबंधक सौ.शुभांगी गौड यांच्याकडे पाठपुरावा करत असून परंतु त्यांनी मी नवीन आहे, मला थोडा वेळ हवाय असे पोटे यांना सांगितले. त्या नंतरही प्रकाश पोटे यांनी मागील महिन्यात पाच ते सहा वेळा त्यांच्या कार्यालयाला भेट देऊन देखील त्या अद्याप पर्यंत कामावर रुजू झालेल्या नाहीत असे तेथील उपस्थित असणारे अधिकाऱ्यांकडून पोटे यांना कळाले. आणि कालच संध्याकाळी सौ. शुभांगी गौड पाच वाजता कामावर हजर झाले आहेत, असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले.काल दुपारी १ वाजता प्रकाश पोटे हे नगर तालुका उपनिबंधक यांच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता त्यावेळी देखील त्या आपल्या कामावर हजर झाल्या नाहीत हे कळाले आणि तेथील उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून आपण कधी येणार हे विचारले असता, त्यांनी मला काही खाजगी काम आहे त्यामुळे मी दुपारनंतर येणार आहे. असे सांगितले. त्यानंतर संतप्त होऊन, या नवीन आणि वेळ काढू नगर तालुका उपनिबंधक यांचा जाहीर निषेध म्हणून प्रकाश पोटे यांनी संघटनेच्या वतीने उपनिबंधकांच्या खुर्चीला हार घालून आपला निषेध व्यक्त केला. वास्तविक पाहता नूतन तालुका उपनिबंधक यांनी शासनाचा एक महिन्याचा पगार हा काम न करता आपल्या खिशात घातला आहे. त्यांनी हा काम न करता घेतलेला,पगार शासनाला मागे करावा अशी देखील  मागणी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
close