shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री.काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रथम पारितोषिक विजेता संघ गलांडवाडी नं. १ ठरला.

श्री.काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा प्रथम पारितोषिक विजेता संघ गलांडवाडी नं. १ ठरला.
इंदापूर प्रतिनिधी: आज दि.११ जून २०२३ रोजी कालठण नं.१(ता. इंदापूर) येथे श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. ही स्पर्धा गुरुवार दिनांक ८ जून २०२३ रोजी सुरुवात करण्यात आली होती. त्या स्पर्धेचे आज सांगता समारंभ झाला . या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक विजेता संघ गलांडवाडी नं. १ ठरला तर द्वितीय पारितोषिक कालठण नं.१ यांनी पटकावला. तृतीय पारितोषिक करेवाडी तर चतुर्थ पारितोषक राजेगाव या क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी पटकवला. सर्व विजेते खेळाडूंची यावेळी संयोजक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

बक्षीस वितरण प्रसंगी  कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना संचालक हनुमंत जाधव,  तंटामुक्ती अध्यक्ष दादा गलांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे, माजी उपसरपंच अण्णासाहेब कोळेकर,
युवा नेते हनुमंत पाटील, य लक्ष्मण कांबळे ,शिवाजी पाडूळे,, राहुल शिंदे, राहुल पाटील ,राम लकडे, रज्जाक शेख,काळभैरवनाथ क्रिकेट संघाचे कॅप्टन राहुल भोई आणि संयोजक उपस्थित होते.
close