shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्ञानसंपदा शाळेत दिंडी सोहळा उत्साहात संपन्न

बाल वारकऱ्यांनी दिंडीतुन दिला सामाजिक संदेश ...

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : २९ /  भारतीय संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही तपोवन रोड येथील ज्ञानसंपदा शाळेत आषाढीच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले . बालगोपालांच्या " विठठल विठ्ठल जय हरी विठ्ठल " नामाने शाळेचा परिससर भक्तीमय वातावरणाने दुमदुमला होता .

 सकाळी ९ वाजता नर्सरी ते इयत्ता १० चे सर्व विद्यार्थी दिंडीत पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते . कुर्ता, डोक्यावर टोकी, गळ्यात टाळ, डोक्यावर तुळस, गळ्यात विणा असा पेहराव करत विद्यार्थी विठुमय झाले .

 सुरुवातीला विठ्ठल रुक्मिणीची आरती करून शाळेच्या परिसरात दिंडीचे प्रस्थान करण्यात आले . मुलींनी फुगड्या खेळत गोल रिंगण करून अभंगाचे गायन केले.

यावेळी दिंडीतून सामाजिक संदेश देण्यासाठी तसेच आपले मूल्य संवर्धनासाठी वारकरी सांप्रदायाची शिकवण देणारे काही संताच्या जीवनावरील प्रसंगाचे सादरीकरण केले जाते . ताटी उघडा ज्ञानेश्वरा, खरिचे महत्व, संत जनाबाईंच्या जात्या- वरील ओव्या, संत तुकाराम महाराज , शिवाजी महाराजांची अलौकिक भेट इत्यादींचा समावेश होता. यामधून स्त्री- पुरुष समानता, सर्वधर्मसमभाव, एकात्मता, अंधश्रद्धा निर्मुलन असे विविध सामाजिक संदेश देण्यात आले.

दिंडी उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या श्लोक, अभंग स्पर्धा घेण्यात आल्या . त्यांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले . यावेळी आजी आजोबा, ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनाली कुलकर्णी, दशिता भोसले यांनी केले .प्रास्ताविक व कैलास जाधव, शिल्पा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन भाग्यश्री जाधव यांनी केले . याप्रसंगी शाळेच्या प्रशासक डॉ .अमिता जैन, मुख्याध्यापिका सौ . शिवांजली अकोलकर व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग उपस्थित होते.
close