संसदमहारत्न खासदार सुप्रियाताईं सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती महाविद्यालयात वृक्षारोपण
इंदापूर प्रतिनिधी:
भारताच्या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज संसदमहारत्न खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका सुवर्णा बनसोडे,प्राचू निगडे, शितल शिंदे, अपर्णा पवार, योगिता तरंगे व विध्यार्थिनी शीतल नरुटे यांच्या हस्ते विविध 54 वृक्षांचे वृक्षारोपण महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतदादा काटे, सचिव अशोक मोरे यांच्या मार्गदर्शना खाली
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे, उपप्राचार्य डॉ. संजय मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर यांनी केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब चव्हाण, विध्यार्थी विकास अधिकारी प्रा.धुळदेव वाघमोडे, प्रा.मारुती अडागळे, प्रा. अंकुश लांडगे, प्राध्यापकेत्तर कर्मचारी विकास क्षत्रिय, गणेश क्षीरसागर, रवींद्र सुतार व विधार्थी उपस्थित होते.

