शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन)
सामाजिक बातमी
दोन महिन्यापासून पिण्यासाठी योग्य पाणीच नाही ,ग्रामसेवकांचे उडवाउडविचे उत्तर . मागील ग्रामसभेमध्ये याविषयी मांडला होता ठराव. एक तर सध्या नगर तालूक्यामध्ये काहि गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे, जनावरांना चारा नाही, 15 दिवसात पाऊस न झाल्यास सोसायटी मार्फत जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याबाबत सुद्धा तहसीलदार, कलेक्टर साहेब व आमचे पालकमंत्री आदरणीय मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील,खा.सुजय विखे साहेब, व जिल्हा बँकेचे चेअरमन मा.शिवाजीराव कर्डीले साहेब आ.बबनराव पाचपुते साहेबांना सुद्धा निवेदन दिले आहे. परंतु सध्या चिचोंडी पाटिल ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पिण्यासाठी योग्य पाणी नाही, चिचोंडी पाटील येथील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यापासून पिण्याचे पाणी खराब येत असून त्वरित पाण्याचे टँकर चालू करावेत, सध्या नळांना दूषित पाणी येत असून ते फक्त वापरण्यासाठीच योग्य आहे. परंतु पिण्यासाठी योग्य नाही ते पाणी पिल्यास ग्रामस्थांना विविध आजार होऊ शकतात गेल्या दोन महिन्यापासून चिचोंडी पाटील गावातील नागरिकांना पिण्यासाठी पाणीच नाही त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अतोनात हाल ग्रामस्थांची होत असून त्यामुळे त्वरित टँकर चालू करण्यात यावे , नळांना सुटणारे दूषित पाण्याने पोटाचे आजार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात जर हे पाणी पिण्यासाठी योग्य असेल तर ग्रामसेवकांनी त्या पद्धतीची लेखी द्यावी अन्यथा या पाण्यापासून काही आजार जाड असल्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरले जाईल. कारण आपण म्हणतात आपल्याला ज्या तलावाचे पाणी पिण्यासाठी येत आहे. त्या तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आहे म्हणून आपल्याला प्रशासन पाण्याचे टँकर देत नाही असे आपण म्हणतात . ही एक प्रकारे पळवाट असू शकते जर प्रशासन असे म्हणत असेल तर प्रशासनाने ह्या पध्दतीचे लेखी दिले असल्यास त्यांची त्या पद्धतीची लेखी द्यावी, ज्या विभागाचे असे म्हणणे आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर आपल्या ग्रामस्थांना या घाण पाणी पिण्याने काही विकार, आजार जडल्यास त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करू असे भाजपा किसान मोर्चा अहमदनगर जिल्ह्याचे सरचिटणीस बबनराव शेळके म्हणाले .

