shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पन्नाशी पुढील जेष्ठ बनले ७०० झाडांचे पालक ; ९ वर्षांपासून करत आहेत झाडांचे संगोपन


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६ /  करमाळा तालुका शहरातील काही ज्येष्ठ मान्यवर मागील नऊ वर्षांपासून खंडोबाचा माळ येथे वृक्ष लागवडीचे काम करत आहेत आणि त्यांचे व्यवस्थित रित्या संगोपन करीत आहेत. या भागाला सर्व ज्येष्ठांनी मिळून *देवराई* असे नाव दिले आहे. हे सर्वजण संध्याकाळी करमाळ्यातील खंडोबाचा माळ येथे फिरण्यासाठी जात असतात व त्याच वेळेस वृक्ष लावणे व लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे काम हे सर्वजण गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत.

 ही सर्व ज्येष्ठ मंडळी जेव्हा फिरण्यासाठी जात होते तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की या भागात भरपूर लोक फिरण्यासाठी येत असतात. येथे फिरण्यासाठी आलेल्या लोकांना बसण्यासाठी सावली असावी बाकडे असावेत निवारा असावा जेणेकरून येथे येणाऱ्या प्रत्येकाला आराम करण्याची बसण्याची सुविधा उपलब्ध होईल तसेच वृक्षारोपण करून निसर्गाचा विकास होईल असा हेतू मनी बाळगून या सर्व ज्येष्ठांनी वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले व गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हे सर्व मंडळी वृक्ष लागवडीचे व त्यांना जोपासण्याचे काम अतिशय मन लावून व अगदी निस्वार्थी भावनेने करत आहेत. आज पर्यंत जवळपास ७०० झाडे लावली आहेत. या सर्व ज्येष्ठ मंडळीतील कोणी ना कोणी दर वेळेस झाडे आणून देतात व सर्वजण मिळून ती झाडे लावतात.

रविवार दि . १६ जुलै रोजी कृषी खात्यातील अविनाश थोरात यांनी ४१ झाडे येथे लागवडीसाठी आणून दिली व सर्वांनी मिळून वृक्षरोपण केले .

 याप्रसंगी अविनाश थोरात (कृषी खाते), अ़ॅ. बाळासाहेब देशमुख, तेजस सुरवसे (वृक्ष मित्र), विधाते सर, शेंडगे साहेब (माजी वन अधिकारी), कवी नारायण सोरटे, मोरेश्वर पवार, अ़ॅ. बिबीशन सोरटे, विहंग विधाते, किरण बोकन, जनक सिंग परदेशी, डॉ. कापडी, उदय मुत्त्याल, राजेंद्र पवार, अभिषेक चुंबळकर, रमेश ढावरे, केदार मोकाशी, जमीर शेख इं. उपस्थित होते. या सर्व ज्येष्ठांनी नागरिकांना आव्हान केले आहे की तुम्ही झाडे आणून द्या आम्ही लावतो सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले तर निसर्गाचा विकास होईल.

 जे काम आजच्या तरुण पिढीने करायला पाहिजे ते काम ही ज्येष्ठ मंडळी करीत आहे समाजाने यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे व निसर्गाचे संगोपन करण्यास मदत केली पाहिजे. या सर्व ज्येष्ठ मंडळींचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. संपूर्ण तालुक्यात सर्व स्तरातून या वृक्ष पालकांचे कौतुक होत आहे .
close