shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्राध्यापकांची श्री छत्रपती महाविद्यालयास भेट.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्राध्यापकांची श्री छत्रपती महाविद्यालयास भेट.
इंदापूर प्रतिनिधी: श्री छत्रपती कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयास नॅक मूल्यांकन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने( यूजीसी) परामर्श योजनेसाठी अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाची 'मेंटार कॉलेज' म्हणून निवड केलेली आहे. या योजनेतंर्गत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाने सहा अन्य महाविद्यालयांशी सामंजस्य करार केलेला आहे. त्यापैकी भवानीनगरचे श्री छत्रपती महाविद्यालय हे एक आहे. या सहा महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी आवश्यक त्या बाबींसंदर्भात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय मार्गदर्शन करणार आहे. या परामर्श योजने अंतर्गत केलेल्या सामंजस्य करारास अनुसरून आज महाविद्यालयातील आयकयूएसीचे सदस्य डॉ.संदीप तारदाळकर, डॉ. संदीप साबळे,डॉ.शशांक माने,डॉ-चंद्रकांत कांबळे,डॉ- सुशील देशमुख  यांनीश्री छत्रपती महाविद्यालयास भेट दिली.महाविद्यालयाचे नव्याने प्राचार्य म्हणून निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.यावेळी महाविद्यालयात उपस्थित असणाऱ्या प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांना नॅकच्या संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
       श्री छत्रपती महाविद्यालयास भेट देऊन. नॅकच्या संदर्भात मार्गदर्शन केल्याबद्दल आलेल्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील सर्व मान्यवर प्राध्यापकांचा सन्मान सत्कार केला त्यांचे व महाविद्यालयाचे आभार मानले. इथून पुढेही अशाचप्रकारे आपले सहकार्य राहावे अशी विनंती केली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ- संजय मोरे, कार्यालयीन अधीक्षक श्री सुशील निंबाळकर सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close