shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथे तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र व श्रीनाथ परिवार वडापुरीच्यावतीने केल्या वह्या वाटप.


वडापुरी येथे तेजपृथ्वी ग्रुप महाराष्ट्र व श्रीनाथ परिवार वडापुरीच्यावतीने केल्या वह्या वाटप.

वडापुरीच्या शाळेमध्ये सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप.
फोटो ओळ:
 १)श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे (दि. ३०)तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

२)१ जुलै रोजी जि. प. प्राथमिक शाळा वडापुरी येथे श्रीनाथ परिवार वडापुरी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन वह्या वाटप.


बावडा: वडापुरी (ता. इंदापूर) येथे सामाजिक जाणीव ठेवून श्रीनाथ विद्यालय वडापुरी व जि. प. प्राथमिक शाळा वडापुरी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप  करण्यात आले.

श्रीनाथ विद्यालय वडापुरी येथे (दि. ३०)तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिताताई खरात यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप व वृक्षारोपण सुधीर पाटोळे व रुपेश वाघमोडे यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी तेजपृथ्वी ग्रुपचे संस्थापक नानासाहेब खरात,लक्ष्मण वाघमोडे, गणेशभाऊ शिंगाडे, सद्दाम बागवान, रूपेश वाघमोडे, आदेश जगताप, शंकर उबाळे, अशोक पतुले, आबा देवकर, अवि गायकवाड, वंदना कांबळे व विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच १ जुलै रोजी जि. प. प्राथमिक शाळा वडापुरी येथे श्रीनाथ परिवार वडापुरी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन वह्या वाटप सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब चंदनशिवे, शिक्षण समितीचे अध्यक्ष गणीभाई मुलानी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी पालक, शिक्षकउपस्थित होते. तसेच प्राथमिक शाळेच्या पालक वर्गांच्या वतीने साऊंड सिस्टिमसाठी दानशूर पालकांच्या वतीने देणगी गोळा करण्यात आली. यावेळी  प्रा. धनंजय देशमुख यांनी साऊंड सिस्टिम साठी प्रथम देणगी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. व शाळा परिसरात वृक्षारोपण करण्याचे यावेळी ठरले.

close