प्राचार्यांनी केले पर्यावरणाविषयी मार्गदर्शन
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ६ / हार्मनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ५ जुलै रोजी वनमहोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संरक्षण आणि त्याबद्दल जनजागृती करणे हा होता. शाळेच्या भिंतीलगत आणि आजूबाजूच्या परिसरात दैनंदिन पाण्याची गरज नसलेली पंधरा लवकर वाढणारी झाडे लावण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, श्री अशोक बेरड सर (प्राचार्य, हार्मनी इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर), यांनी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे हया विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वनमहोत्सवानिमित्त इयत्ता ७ वीच्या मुलींनी एक समूह गीत सादर केले, ज्याचे सर्वांनी कौतुक केले. इयत्ता ८ वी च्या मुलांनी मूक अभिनय सादर केला, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची जाणीव झाली.
कार्यक्रमाचे आयोजक श्री संदेश विलास खरात (शिक्षक,हार्मनी इंटरनॅशनल स्कूल, अहमदनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. शाळेच्या मॅनेजमेंट ने सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .

