shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अखेर पोटखराब्याचा प्रश्न मार्गी लागला ; देडगाव च्या शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण


प्रतिनिधी : संजय वायकर

नेवासा : २९ /  नेवासा तालुक्यातील देडगाव येथे १८८ शेतकऱ्यांच्या पोट खराब्याचा प्रश्न मा.नामदार पालकमंत्री राधाकृष्णविखे पाटील यांच्या मदतीने मा.जय हरी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी सोडविल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे .

 आ . बाळासाहेब मुरकुटे यांनी पोट खराबा दुरुस्ती करून आणल्याबद्दल व १८८ शेतकऱ्यांना  त्यांचे हक्काचे उतारे मिळवून दिल्याबद्दल शेतकरी वर्ग व देडगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

 यावेळी कामदार आमदार  बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या कामावर प्रभावित होवून श्री उद्धव मुंगसे पाटील (ग्रामपंचायत सदस्य देडगाव ) व श्री कारभारी मुंगसे पाटील (माजी चेअरमन देडगाव ) यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या उत्साहात प्रवेश केला. 

यावेळी आकाशभाऊ चेडे, शहादेव मुंगसे, पोपटराव बनसोडे, रामचंद्र कदम, संभाजी काजळे,राजेंद्र कदम आकाश हिवाळे , उद्धव नांगरे , हरिभाऊ तागड , निलेश कोकरे , महेश कदम , श्रावण औटी , विजय अंधारे , अशोक मुंगसे, मिनीनाथ मुंगसे , प्रेमचंद हिवाळे , किरण मस्के , चांगदेव तांबे ,अशोक तांबे ,लक्ष्मण तांबे , खंडेश्वर तांबे , जालिंदर तांबे ,लखन भताडे ,दिलीप कुसळकर , गोपाळ कुसळकर , पोपट पवार तसेच समस्त ग्रामस्थ व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close