shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिंगारच्या युवकांनी केले गौमातेवर उपचार



आईचं दूध तेच गाईच दूध म्हणतात . . .

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १२ / आईचं दूध तेच गाईच दूध म्हणतात .बाईला वाचवणारा हिरो आणि गाईला वाचवणारा गुन्हेगार अशी मानसिकता असलेल्या या जगात निस्वार्थ गौसेवा करणारे खूप कमी लोक असतात .

 त्यातीलच हे काही भिंगार शहरातील युवक ११ जुलै रोजी संध्याकाळी श्री सतीश (नाना) मोरे यांना माहिती समजली की भिंगार शहरातील विजय नगर , भंडारी सिमेंट गोडाऊन पाठीमागे एक गौमाता जखमी अवस्थेत आहे तेव्हा सतीश मोरे व त्यांचे मित्रपरिवार यांनी तिथे जाऊन पहाणी केली व तात्काळ डॉक्टरांना बोलावले व उपचार केले  तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की त्या गौमतेचा पाय मोडला आहे. पण साधन सामग्रीचा अभाव असल्या कारणाने रात्री पायावर उपचार करणे शक्य झाले नाही . 

सकाळी लवकरच सतीश (नाना) मोरे व त्यांचे मित्रपरिवार सचिन पेंदूरकर , निलेश भाऊ साठे , योगेश साठे , ओंकार पवार , अभि पाठक , करण सोळसे आदेश काळे , डॉ.गीते सर व डॉ. भुकेले सर हे त्या गौमतेचा ठिकाणी जमले व त्या गौमतेच्या पायावर उपचार केले . आता त्या गौमातेचा पायाला प्लास्टर करून ती आता सुखरूप आहे .
close