shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*आही सहकार्य करू तुम्ही गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करा - महेश पटारे


*भोकर जि.प. शाळेत शाळा पुर्व तयारी मेळावा, नवागतांचे स्वागत व गणवेश वितरण संपन्न

चंद्रकांत झुरंगे - भोकर
पुर्वीपासून जिल्हा परीषद शाळेतील शिक्षण हे दर्जेदारच आहे. मराठी माध्यमातील शिक्षण घेवूनच आतापर्यंतचे विद्यार्थी देशातील सर्वोच्च अधिकारी, पदाधिकारी व संशोधकांसह सर्वजण मराठी माध्यमातून शिकलेले आहेत. बदलत्या काळात बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार आता जि प शाळांनी इंग्रजीवर भर देण्याची गरज आहे व त्यास पालकांची साथ ही तीतकीच महत्वाची असते तर गुणवत्ता टिकू शकते. आमच्या पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करू तुम्ही गुणवत्तेवर व शिस्तीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन येथील माजी उपसरपंच महेश पटारे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील जिल्हा परीषद शाळेत ‘शाळा पुर्व तयारी मेळावा’, ‘नवागतांचे स्वागत’ व ‘गणवेष वितरण संमारंभ’ प्रसंगी अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी येथे नव्याने हजर झालेले मुख्याध्यापक कचेश्वर जठार, शाळा व्यावस्थापन समीतीचे अध्यक्ष सोमनाथ पंडीत, उपाध्यक्ष दिलीप आहीरे, मार्गदर्शक भाऊसाहेब चव्हाण, पत्रकार चंद्रकांत झुरंगे व हरीभाऊ बिडवे आदि व्यासपिठावर उपस्थीत होते.
मातृभाषेतील शिक्षण हे वाघीणीचं दुध असतं म्हणजेच मातृभाषेतील ज्ञानाचे लवकर आकलन होते. त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहण्यास सोपं असत त्याच बरोबर मातृभाषा हि समजायला सोपी असते म्हणून केवळ इंग्रजीच्या पाठीशी न पळता मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य दिले पाहीजे असे मत जेष्ठ मार्गदर्शक व सेवानिवृत्त शिक्षक भाऊसाहेब चव्हाण यांनी सांगीतले. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्यालाही स्पर्धेत उतरले पाहीजे. आपण ही कधी सरकारची मदत तर कधी पालकांचा सहभाग घेवून शाळा आकर्षक बनवत आपणही इंग्रजीवर भर देत स्वच्छता, टापटिप पणा व गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचे मत पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांनी व्यक्त केले.
आम्ही येथील सर्व शिक्षक व पालकांच्या सहकार्यातून आपल्या सुचनांचे पालन करत पालकांच्या अपेक्षा पुर्ती करू, तुम्ही गावपातळीवरील सहकार्य करा आम्ही गुणवत्ते बरोबरच भौतीकतेवर लक्ष केंद्रीत करून ग्रामस्थांची ही अपेक्षापुर्ती करू असे आश्वासन यावेळी येथे नव्याने हजर झालेले मुख्याध्यापक कचेश्वर जठार यांनी दिले. यावेळी येथे नव्याने हजर झालेले मुख्याध्यापक कचेश्वर जठार यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार व स्वागत करण्यात आले. 
यावेळी या शाळेतील 166 विद्यार्थ्यांना मोफत गणवेष वितरण करण्यात आले.त्यात 56 मुले व 110 मुलींचा समावेश आहे. यावेळी झालेल्या शाळा पुर्व तयारी मेळाव्यात नव्याने शाळेत दाखल झालेल्या बालगोपाळांना मान्यवरांचे हस्ते गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता पहीलीतील मुलांना रंगीबेरंगी कागदी टोप्या, खुर्च्या व विविध प्रकारच्या खेळण्या दाखवत या बालकांचे व त्यांचे पालकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी इंद्रभाण दिवटे, राजेंद्र चौधरी, सोमनाथ बर्डे, शाम न्हावले, रविंद्र विधाटे, राजेंद्र विधाटे, रमेश सुतार, दादा डूकरे, पुजा सुतार, मंगल अमोलीक आदिंसह पालक उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मल्हारी ठोकळ, जगन्नाथ विश्वास, अनंता गोरे, सुरेखा पालवे, वंदना माळी, छाया घोडके,अश्वीनी परदेशी आदिंनी विशेष परीश्रम घेतले. सुत्रसंचालन मल्हारी ठोकळ यांनी केले तर आभार जगन्नाथ विश्वास यांनी व्यक्त केले.

भोकर येथील जिल्हा परीषद शाळेत नवागतांचे स्वागत करताना मुख्याध्यापक कचेश्वर वाघ, सोमनाथ पंडीत, उपाध्यक्ष दिलीप आहीरे, मार्गदर्शक भाऊसाहेब चव्हाण, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, राजेंद्र चौधरी, हरीभाऊ बिडवे आदिंसह मान्यवर उपस्थीत होते. (छाया - चंद्रकांत झुरंगे, भोकर)

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close