वजीर शेख - पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथील श्री.टकले गुरुजी यांचे सुपुत्र श्री.रमेश पाटील टकले यांची नुकतीच नगर रचनाकार अधिकारी (वर्ग-१) पदी निवड होऊन त्यांची मुंबईत पोस्टिंग झाल्याबद्दल हत्राळ - सैदापुर ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच भिमराव टकले,टकले गुरुजी, ग्रामसेविका गोसावी मॅडम, अंबादास बळीद,पोपटराव टकले, उपनिरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, सुभाष केदार पंचायत समिती पाथर्डी, नवनाथ शिवणकर, अशोकराव मरकड, वसंत केदार, डॉ,क्रुषिराज टकले, पवन शिवणकर,परमेश्वर टकले, नामदेव शिवणकर आदि मान्यवर व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव काकडे यांनी केले तर आभार संपत टकले यांनी मानले.
वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

