shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचा अभिष्टचिंतन दिन बाब्रस मळा येथे धुमधडाक्यात साजरा.

मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचा अभिष्टचिंतन दिन बाब्रस मळा येथे धुमधडाक्यात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: 
धर्मवीर संभाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष व मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचा अभिष्टचिंतन दिन बाब्रस मळा येथे धुमधडाक्यात दिनांक १७ जुलै रोजी साजरा करण्यात आला. 
इंदापूर शहरातील माजी नगरसेवक विनायक बाब्रस यांचा जन्म १७ जुलै १९७४ साली झाला .त्यांच्या आईचे नाव प्रभादेवी तर वडिलांचे नाव विष्णू बाब्रस आहे. त्यांचा व्यवसाय विष्णू प्रभा डेव्हलपर्स व विष्णू प्रभा फार्म हाऊस पंधारवाडी -  वडापुरी येथे आहे. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने सध्या ते इंदापूर शहरातील धर्मवीर संभाजी मित्र मंडळ याचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात. या मित्र मंडळाच्या वतीने सर्व सहकाऱ्यांना सामावून घेत वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत असतात तसेच स्वतः संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मध्ये वारकरी दिंड्यांना अन्नदान करतात. इंदापूर नगरपरिषदेवर  २०१२ ते २०१७ या कालावधी मध्ये नगरसेवक म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात भरीव काम केले. असे  सामाजिक बांधिलकी जपणारे विनायक बाब्रस  यांचा ५० वा वर्षात पदार्पण केल्याबद्दल अभिष्टचिंतन दिन बाब्रस मळा येथे धर्मवीर संभाजी मित्र मंडळ ,राजेंद्र चौगुले मित्रपरिवार तसेच इंदापूर शहरातील मित्रपरिवार यांच्या वतीने अतिशय थाटामाटात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.



यावेळी प्रमुख उपस्थित प्रा.व्ही.बी.जाधव सर, विश्वस्त व मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, मा.नगराध्यक्ष अशोक गाणबोटे, माळवाडीचे सरपंच प्रतिनिधी बाळासाहेब व्यवहारे, निखिलशेठ बाब्रस, अहमदरजा सय्यद, गटनेते गजानन गवळी, प्रा.उन्हाळे सर, विलास बाब्रस (वकील), गारदी रावसाहेब, आनंद मखरे, बाळासाहेब मखरे, रामदास चौगुले, राजू गुळीक, शुभम मखरे, चंदू सोनवणे, पपू शेख, अन्वरभाई शेख, समदभाई सय्यद, नासीर शेख, विवेक चौगुले, भारत माने, भैय्या चौगुले, माऊली वाघमोडे इ.बहुसंख्येने उपस्थित होते.
             कार्यक्रमाचे नियोजन मनोज भापकर, समीर दुधनकर, रमेश बनसोडे, दत्तू शिंदे, शब्बीर शेख, दिगंबर मोहिते, अनिल चव्हाण, बापू भिसे, हर्षवर्धन कांबळे, गणेश गोरे, योगेश गोरे, स्वप्निल शिंदे इत्यादींनी केले.
close