नॅक मूल्यांकनामुळे महाविद्यालयाचा गुणात्मक आलेख उंचावतो- डॉ.विलास बुवा
इंदापूर प्रतिनिधी: श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे छत्रपती काला व वाणिज्य महाविद्यालयाच्या आय.क्यू.ए.सी विभागाच्या माध्यमातून प्राध्यापक प्रबोधनीमध्ये वालचंदनगर कळंब येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.विलास बुवा सर यांचे "नॅक मूल्यांकनाला सामोरे जाताना" या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते असे म्हणाले, "आजच्या भारतीय शिक्षण प्रणालीचा विचार करता शिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करायची असेल तर प्रत्येक महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन पिअर टीम व्हिजिट च्यावेळी जसं महाविद्यालयाचं शैक्षणिक वातावरण असतं.त्याचप्रमाणे सदैव महाविद्यालयाचं शैक्षणिक वातावरण असायला हवं. महाविद्यालयाचं केलं जाणारं नॅकमूल्यांकन हे महाविद्यालयाचा गुणात्मक आलेख उंचावन्यासाठी हातभार लावतं.ज्या महाविद्यालयांनी अजूनही नॅक मूल्यांकन केलेलं नाही. अशा महाविद्यालयांनी गुणात्मक उंची वाढवण्यासाठी नॅक मूल्यांकन करून घ्यावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे होते. अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना ते म्हणाले, " नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करता प्रत्येक महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करून घेणं गरजेचं आहे.नुकतच अहमदनगर जिल्ह्यातील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर या महाविद्यालयाने नॅक मूल्यांकना मध्ये A++ ग्रेड मिळवून नविन आदर्श निर्माण केला आहे. तसा आदर्श प्रत्येक कॉलेजने निर्माण करून महाविद्यालयाचा गुणात्मक आलेख उंचावला पाहिजे.असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्रचार्य डॉ. संजय मोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. योगिता तरंगे मॅडम यांनी केले. आभार प्रा. शिवाली माने देशमुख मॅडम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर व सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

