shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉमनिक रोझारिओ यांची हरिगाव येथील मतमाऊली चर्च प्रमुख धर्मगुरूपदी नियुक्ती


बी.आर.चेडे - शिरसगांव
हरिगांव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे प्रमुख धर्मगुरू स्व.फा.सुरेश साठे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या प्रमुख धर्मगुरूपदी सध्या प्रभारी असलेले व प्रजा जागृती शिक्षण संस्था अहमदनगर सचिव व धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांची महागुरुस्वामी लूरडस डानियल यांनी संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरूपदी नियुक्ती केली आहे.


फा.रोझारिओ यांची ६ फेब्रुवारी १९९४ या वर्षी राजोडी [वसई] या गावी गुरुदीक्षा झाली.धर्मगुरूपदी २९ वर्षापासून कार्यरत आहेत.१९९९ ते २००४ पर्यंत राहाता येथे प्रमुख धर्मगुरू,२००४ ते २०१२ पर्यंत केंद्ळ सेंट जोसेफ हायस्कूल प्राचार्य,२०१२ ते २०१५ सेंट जॉन इंग्लिश मिडियम स्कूल राहाता प्रिन्सिपाल,जून २०१५ ते मे २०१७ केंदळ,व २०१७ ते आजपर्यंत हरिगांव येथे धर्मगुरू आहेत.२०२० पासून प्रजा जागृती शिक्षण संस्था अहमदनगर सचिवपदी कार्यरत आहेत.मतमाउली यात्रेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने व त्यांची नियुक्ती झाल्याने सर्वाना आनंद झाला व त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111
close