shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यातील कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने दिले निवेदन पत्र.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यातील कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने दिले  निवेदन पत्र.
इंदापूर प्रतिनिधी: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोळी समाजास जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळण्याकरिता कोळी महासंघाची  व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक लावून मार्ग काढण्यात संदर्भात कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विधीतज्ञ चेतन रमेशदादा पाटील यांच्या सहीचे  निवेदन पत्र देण्यात आले
आज दि. १६ जुलै२०२३ रोजी इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इंदापुर तालुक्यातील कोळी समाज्याच्या शिष्टमंडळाने भेट घेवुन महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यातील  अनुसूचीत जमातीतील कोळी महादेव , मल्हार कोळी ,  टोकरे कोळी ,ढोर कोळी जमातीच्या बांधवांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळाव , प्रांत बारामती व तहसीलदार इंदापुर यांना जात प्रमाणपत्र मिळने कामी सबंधीत अधीकारी यांना आदेश व्हावा , जिल्हा अधीकारी पुणे यांना प्रमाण पत्र मिळणे कामी सहकार्य करावे ,    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत राज्य स्तरीय बैठक घेवुन सदरचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचे निकष ठरवुन जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळण्याकरीता शासन निर्णय काढण्याची विनंती करणे बाबत शिष्टमंडळाने हर्षवर्धन पाटील  यांना निवेदन दिले .
यावेळी राजेंद्र हजारे , आण्णासाहेब कोळी , ह.भ प चैतन्य महाराज शिंदे ,अमर धुमाळ , शत्रुघ्न घाडगे , अभिजीत जाधव सर  , नामदेव सुरवसे  गणेश कोळी , डॉ नवनाथ पवार ,लाला साहेब माने , सुनिल माने , सचिन दरेकर सर ,  सतिष सोबनवळ , संतोष माने  , राजु लावंड , सचिन पवार , विशाल पवार , प्रविण पवार , शक्ती आधटराव , बाळु हजारे , पप्पु हजारे राजु हजारे , भाऊ रोकडे ,किरण अंकुशराव व मोठ्या संख्येने कोळी समाज्याचे बांधव उपस्थीतीत होते.
close