लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया सामाजिक उपक्रमातून हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बोराटवाडी मध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
*विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी बनवलेल्या सायकल स्टँड चे उद्घाटन करण्यात आले.तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय बॅग,पाणी बाॅटल वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालय परिसरामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले.*
*विद्यालयात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला, निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.*
ज्या विद्यार्थ्यांचा आज वाढदिवस आहे अश्या विद्यार्थ्यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले. *श्री.शिवाजी एज्युकेशन सोसायटी तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना केक व समर्थ मेडिकल, बोराटवाडी चे मालक श्री.दिपक पवार यांच्या तर्फे जिलेबी चे वाटप करण्यात आले.*
विद्यार्थ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी एका दानशूर व्यक्तीने नाव अज्ञात ठेवून शाळेसाठी दोन संगणक भेट दिले.
बोराटवाडी शंकर विविध सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री.कृष्णा बळवंत बोराडे यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बोराटवाडी गावचे *सरपंच. दत्तू अण्णा सवासे, दूधगंगाचे संचालक श्री.दयानंद गायकवाड, कृष्णा बोराडे ,.तुकाराम बर्गे, तुकाराम इंगवले, .लालासो हेगडकर, रामभाऊ पाटील,
मोहन मारकड ,प्रकाश खुसपे , संजय गायकवाड, पोपट सुर्दिक तसेच बोराडवाडी व पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.*
विद्यार्थ्यांनी मनोगतात *चि.हर्षराज सुद्रिक,ची.शिवतेज मोरे यांनी तर मान्यवरामधून.कृष्णा बोराडे. दत्तूआण्णा सवासे, दयानंद गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य भिमराव आवारे सर यांनी साहेबांचा आजपर्यंतच्या जीवन प्रवास यावर आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर निलाखे सर यांनी केले तर आभार शशिकांत गायकवाड सर यांनी मानले.

