पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, निरवांगी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधि : पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, निरवांगी, तालुका- इंदापूर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
मंगळवार रोजी दिनांक15.08.2023 पद्मभूषण वसंत दादा पाटील माध्यमिक विद्यालय, निरवांगी येथे विद्यालयात सकाळी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटी, निरवांगी चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.श्री. हणमंत संपतराव पोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी निरवांगी गावातील ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, गावचे पोलीस पाटील, विविध सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत चे सर्व माजी पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व तरुण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, बालवाडी आणि अंगणवाडी शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात बालवाडी ते प्राथमिक शाळा विद्यार्थी आणि हायस्कूलचे विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, काही विद्यार्थ्यांनी चांगली भाषणे केले आणि त्यांना व्यासपीठावरील मान्यवरांनी पैशाच्या स्वरूपात बक्षीस देण्यात आली, काही मान्यवरांनी विद्यार्थ्यांना खाण्यासाठी खाऊ दिला.
या कार्यक्रमात नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपले विचार व्यक्त केले, त्यांनी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केले, प्रयत्न केले आणि त्याग केला यावर सविस्तर माहिती दिली. स्वतंत्र भारत तयार करण्यासाठी अनेक ज्ञात आणि अज्ञात भारतीयांनी आपला त्याग केला, यावर सविस्तर माहिती दिली,
यावेळी विद्यार्थ्यांनी कवायत सादर केली.
शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री शिरसट सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

