इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना राख्या बांधून अनिताताई खरात यांनी रक्षाबंधनाचा सण केला साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: महिला दक्षता समितीच्या सदस्या व तेजपृथ्वी ग्रुप अध्यक्ष अनिताताई खरात यांनी प्रति वर्षाप्रमाणे पोलीस बांधवांना राख्या बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला.
सदैव आपल्या पाठीशी रात्रंदिवस ढाल म्हणून उभा असतात अशे आपण ज्यांच्या विश्वासावर रात्रंदिवस बिंदास्थ फिरत असतो. जे कोणत्याही सणावाराला स्वतःपेक्षा इतरांचा आधी विचार करतात, इतरांच्या संरक्षणासाठी सनावारालाही रात्रंदिवस रस्त्यावरती उभा असतात, असे आपले पोलीस भाऊ यांच्याबरोबर आज इंदापूर पोलीस स्टेशन येथे तेजपृथ्वी ग्रूपच्या संस्थापक अध्यक्षा सौ अनिता खरात यांनी आनंदात रक्षाबंधन साजरा केला. या वेळी पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच धर्मचंद लोढा (पपा)बाळासाहेब क्षीरसागर हे ही उपस्थित होते

